Fri. May 7th, 2021

बुलडाण्यात कोरोनारुग्णांच्या जीवाशी खेळ

बुलडाणा: राज्यात कोरोनाचा कहर सुरु असून कोरोनामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. मात्र रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे देखील रुग्णांचे बळी जात असल्याचं समोर आलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणी न करता रुग्णाला रेमडीसीवीर देण्यात आल्याने रुग्णाचा बळी गेला आहे.

खामगाव शहरातील हा धक्कादायक प्रकार असून शहरातील लाईफलाईन रुग्णालयाचे डॉक्टर आशिष अग्रवाल यांनी रुग्णाला आरटीपीसीआर चाचणी न करता रुग्णाला रेमडीसीवीर दिले. या चुकीच्या उपचारपद्धतीमुळे रुग्णाचा मृत्यू झाला. इतकेच नव्हे, तर या डॉक्टरांनी रुग्णाचा मृतदेह प्रोटोकॉल न पाळता नातेवाईकांना सुपूर्द केला. आता हे चारही नातेवाईक कोरोनाबाधित असल्याचं समोर येत आहे.

प्रशासनाकडून या सर्व प्रकाराबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *