Wed. Jan 19th, 2022

उंदराला वाचवण्याच्या प्रयत्नात ‘त्याने’ गमावला स्वत:चा जीव

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा

 

भंडारामध्ये विहिरीत उंदीर पडल्यानं एक तरुण त्याला काढण्यासाठी उतरला होता. मात्र, या तरूणाला विहिरीत असलेल्या सापाने दंश केल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची

धक्कादायक घटना घडली.

 

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात अंतर्गत एकोडी गावातील ही दुर्दैवी घटना आहे. अंकित खेडीकर असं या मृत तरुणाचं नाव आहे.

 

अंकित आपल्या घरच्या विहिरीत पडलेल्या उंदीर बाहेर काढण्यासाठी उतरला असता टवऱ्या जातीच्या विषारी सापानं दंश केला.

 

सापाने दंश केल्याचं लक्षात येताच एकोडी प्राथमिक आरोग्य रुग्णालयात अंकितला दाखल करण्यात आले.

 

मात्र, अंकितची प्रकृती आणखीच खालवल्यांन त्याला नागपूर मेडिकल कॉलेज येथे नेले असता तेथे त्याची प्राणज्योत मावळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *