Fri. Jan 21st, 2022

राज्य सरकार आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून बैलगाडी शर्यत पार

सांगली : सांगली जिल्ह्यातील झरे परिसरामध्ये गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यत पार पाडण्यात आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी २० तारखेला झरे गावांमध्ये बैलगाडी शर्यत घेण्याचे जाहीर केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाची बंदी असल्यामुळे बैलगाडी शर्यत कोणत्याही परिस्थितीत होऊ द्यायचे नाही यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने कंबर कसली होती. या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती ठिकठिकाणी नाकेबंदी होती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तरीही झरे गावाच्या हद्दीवर वाक्षेवाडी त्या पठारावर गनिमी काव्याने बैलगाडी शर्यत पार पडली. यंत्रणा कल्पनाही न होता बैलगाडी शर्यत पार पडली आहे.

प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि संचारबंदी लागू केलेली असतानाही पोलीस -प्रशासनाला चकवा देऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी वाक्षेवाडीच्या पठारावर सूर्योदयासोबत बैलगाडी शर्यतीचे मैदान पार पाडले. शर्यतीसाठी राज्यातून विविध भागांतून हजारोंच्या संख्येने तरुण शेतकरी आले होते. शर्यतीनंतर आमदार पडळकर यांनी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्यभर उभारणाऱ्या आंदोलनाला साथ देण्याचे आणि तरुणांनी शांततेत घरी जाण्याचे आवाहन केले.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी बंदीचा आदेश झुगारून झरेत बैलगाडी शर्यतीच्या मैदानाचे आयोजन केले होते. या शर्यत होऊ नये म्हणून पोलिसांनी मैदान उध्वस्त केले . झरे परिसरात कडक पोलीस बंदोबस्तही ठेवला होता. तसेच संचारबंदी लागू केली होती. शर्यतीसाठी गुरुवारी रात्री माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माणचे आमदार जयकुमार गोरे झरेत दाखल झाले होते. मध्यरात्री गनिमी काव्याने शर्यतीचे ठिकाण बदलून वाक्षेवाडीच्या पठारावर शर्यती घेण्याचे नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *