Tue. Jul 14th, 2020

इथे नरभक्षक वाघिणीने माजवली दहशत…

यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव मोहदाभागात या वाघिणीची मोठी दहशत निर्माण झाली आहे. या वाघीणेने अद्याप 13 जणांचा बळी घेतला आहे. या नरभक्षक वाघिणीचा गेल्या आठ दिवसांपासून शोध सुरु आहे.

या वाघिणीला ठार मारण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर संपूर्ण देशाचं लक्ष या ठिकाणी लागले आहे.

वाघिणीसह तिचे दोन बछडे देखील आहेत. या वाघिणीच्या शोध मोहीमेसाठी दोन हत्तींची मदत घेण्यात येतं आहे, यासाठी शार्प शूटर म्हणून ओळखले जाणारे हैदराबादचे नवाब शाफात अली खान यांना पाचारण करण्यात आलं आहे.

या सर्व मोहिमेसाठी तयार केलेल्या सेंटर पॉईंट बेस कॅम्प परिसरातून वाघिणीची कुठे हालचाल आहे का?… वाघिणीसह बछड्यांचे पायाचे ठसे कुठे दिसतात का?… अशा पद्धतीनं आता शोध मोहीम सुरु आहे. सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ही शोध मोहीम सुरु असते.

विशेष म्हणजे या मोहिमेअंतर्गत वेगवेगळे 5 युनिट तयार करण्यात आले आहेत. ज्या भागात शोध मोहीम सुरु आहे. त्या ठिकाणी उंच सखल जंगल, शेती आणि झुडूपं आहेत. यामुळे वाघिणी कुणाला दिसत नाही… अशा परिस्थितीत तिचा शोध घेणं कठीण बाब होऊन बसली आहे.

 हत्तींच्या मदतीने होणार नरभक्षक वाघिणीची शिकार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *