हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचं 30 फुट खोल कोरडया कॅनलमध्ये आंदोलन
जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर
हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी 30 फुट खोल कोरडया कॅनल मध्ये आंदोलन सुरु केलं आहे. मोहोळ तालुक्यातील 14 गावच्या शेतकऱ्यांसाठी आष्टी उपसा सिंचन योजना मंजूर झाली. मात्र, 17 वर्षानंतर देखील शेतकऱ्याला पाणी मिळत नाही.
सरकारच्या काळात 1996 साली मंजूर झालेल्या आष्टी उपसा सिंचन योजना मागील 17 वर्षांपासून रखडली आहे. ही योजना मार्गी लागली तर 14 गावांचा पाणी प्रश्न मिटून साडे नऊ हजार हेक्टर जमिनी ओलिताखाली येणार आहे. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी जनहित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन सुरु केलं.