Tue. Mar 9th, 2021

‘लोक मरतात, म्हणून लॉकडाऊन करणं परवडणार नाही’

कोरोना व्हायरसचं संकट जगभरात पसरलं असताना अनेक देशांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. काही ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. ब्राझिलसारख्या देशात ४ हजार लोक कोरोनाग्रस्त असूनही लॉकडाऊन न करण्याचा धक्कादायक निर्णय ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सानारो यांनी केलं आहे.

कोरोनामुळे जगातील अनेक देशांत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. भारतातही २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होणार आहे. मात्र लोकांच्या जीवाचा विचार करून अर्थव्यवस्थेची पडझड स्वीकारत लॉकडाऊनचा निर्णय जगभरातील अनेक देशांनी केला आहे. मात्र ब्राझिलने मात्र लॉकडाऊन शक्य नसल्याचं म्हटलं आहे. लोक मरतात, म्हणून लॉकडाऊन करणं देशाच्या अर्थव्यवस्थेला परवडणारं नसल्याचं बोल्सानारो यांनी म्हटलंय.

बोल्सानारो यांनी लोकांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि इतर उपायांकडे दुर्लक्ष करत लोकांनी कामावर हजर राहावं असा आदेशच सरकारने दिला आहे. जगभरात लॉकडाऊन सुरू असताना ब्राझिलचा हा निर्णय लोकांसाठी धक्कादायक ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *