Fri. Jul 30th, 2021

गाडीने अचानक पेट घेतला आणि ‘ती’ जिवंत जळाली

वाकडच्या भूमकर चौकाजवळ एक अंत्यत दुर्देवी घटना घडली आहे.

वाकडच्या भूमकर चौकाजवळ चार चाकी जळून खाक झाली असून, या गाडीतील महिला जिवंत जळाली, मध्यरात्री दीडच्या सुमरास ही घटना घडली. 

भुजबळ चौकच्या दिशेने भूमकर चौकाकडे येताना या गाडीने अचानक पेट घेतला.

गाडीतील इतर व्यक्ती उतरले मात्र महिलेला या गाडीतून उतरता आले नाही.

pune-womenfire.jpg

अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत महिलेचा जळून मृत्यू झाला होता, Mh 14 am3709 असा त्या गाडीचा नंबर आहे. संगीता

हिवाळे असं दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्यांच्यासोबत त्या गाडीमध्ये आई आणि भाऊ देखील होते. 

त्यांनी संगीताला बाहेर काढण्याचे खुप प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलं नाही. 

या घटनेनंतर संगीता आग पाहून बेशुद्ध पडल्या असाव्यात असा अंदाज वर्तवला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *