Fri. Apr 16th, 2021

हार्दिक-राहुलसह करणलाही कॉफी पडली महागात!

हार्दिक पांड्याच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. ‘Koffee With Karan’ या कार्यक्रमात महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पांड्या, लोकेश आणि करण जोहर या तिघांविरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘Koffee With Karan’ या कार्यक्रमात महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हार्दिक पाड्यांला भारतीय संघातून काही काळासाठी वगळण्यात आले होते.

मात्र नंतर या दोघांचेही निलंबन मागे घेण्यात आले.  त्यानंतर आता राजस्थानमध्ये लोकेश राहुल, हार्दिक पांड्या आणि करण जोहर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध राजस्थानच्या जोधपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोघांव्यतिरिक्त चित्रपट निर्माता करण जोहर याच्या विरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जोधपूरमधील सरेचा गावातील देवाराम मेघवाल यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

त्यामुळे आता हार्दिक-राहुलसह करणलाही ‘Koffee With Karan’ मधील कॉफी चांगलीच महागात पडली आहे असं म्हणणं नक्कीच वावगं ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *