रो हाऊसवर दरोडा, रोकड आणि दागिने लंपास

पुणे : पिंपरी चिंचवडमधील चाकण परिसरात तीन चोरांनी रो हाऊसवर दरोडा टाकला आहे. या दरोड्यात चोरांनी रो हाऊसमधून रोख रककम आणि दागिने लंपास केले आहेत. चोरी करतानाची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.
या दरोड्यात चोरट्यांनी ८ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज आणि रोख रककम देखील लंपास केली आहे. याप्रकरणी गोविंद जाधव यांनी चाकण पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
जाधव हे आपल्या कुटुंबियांसह चिंचवडला मुलीला भेटायला गेले होते. तेव्हाच चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचं फायदा घेत सकाळच्या सुमारास रो हाऊसवर दरोडा टाकला. या दरोड्यात चोरट्यांनी ४ लाख २ हजार रोख, १५ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन हजारांचे स्पोर्ट शूज लंपास केले.
जाधव कुटुंबीय चिंचवडहून परतल्यानंतर चोरीची घटना समजली. या दरोड्या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.