Fri. May 7th, 2021

अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर सीबीआयचे छापे

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, विविध ठिकाणांवर छापे मारण्यास सीबीआयने सुरुवात केली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणावरून मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली होती.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं होतं. ज्यामध्ये अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं लक्ष्य दिल होतं, असा आरोप देशमुखांवर करण्यात आला होता. या प्रकरणी परमबीर सिंग यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह या प्रकरणातील संबंधित इतरांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आहे. तसंच या प्रकरणाच्या तपासाचाच भाग म्हणून काही ठिकाणी सीबीआयकडून छापेमारीही सुरू करण्यात आली आहे.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *