Wed. Dec 8th, 2021

…म्हणून वानखेडे स्टेडिअमच्या वॉशरूममध्येही लावलेत CCTV कॅमेरे

वृत्तसंस्था, मुंबई

 

मुंबईतील वानखेडे स्टेडिअमच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलीय. स्टेडिअमवर 300 हून अधिक कॅमेरे तैनात करण्यात आलेत. विशेष म्हणजे हे कॅमेरे स्टेडिअमच्या आवारातील वॉशरूममध्येही लावण्यात आलेत.

मुंबई पोलीस आणि इतर सुरक्षा संस्थांनी वानखेडे स्टेडीअमवर सुरक्षा वाढवण्यासंबधी सूचित केल्या होत्या.

भारत आणि न्यूझिलंड पहिल्या वन डे मॅच दरम्यान एका परदेशी नागरिक वानखेडे स्टेडिअमचे फोटो काढताना निदर्शनास आला होता. ही घटना मुंबईतल्या 26/11च्या दुर्घटनेची आठवण करून देणारी असल्याचं पोलिसांचं म्हणण आहे.

26/11 च्या हल्ल्याआधी हेडलीनं 1 वर्ष मुंबईत वास्तव्य केलं होतं आणि मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांचे अभ्यास करून दहशतवादी हल्ला घडवला. असाचं हल्ला वानखेडे स्टेडिअमवर होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *