Thu. Jan 20th, 2022

शाहरुखच्या मॅनेजरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

  अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान संबंधित क्रुझवरील ड्रग्जपार्टी प्रकरणात २५ कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी आता एक मोठा खुलासा झाला आहे. शाहरुख खानची मॅनेजर पुजा ददलानीचे सीसीटीव्ही फुटेज एसआयटी पथकाच्या हाती लागले आहे. त्यामुळे याप्रकरणी मुंबई पोलीस पूजा ददलानी आणि आर्यन खानचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.

  क्रुझवरील ड्रग्जपार्टीप्रकरणी आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप प्रभाकर साईलने केला होता. आता शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानीचा सीसीटीव्ही फुटेज पोलीसांच्या हाती लागला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुंबईच्या लोअर परळमध्ये पूजा ददलानीची कार दिसून आली आहे. लोअर परळच्या याच भागात २५ कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याला आरोप प्रभाकर साईल यांनी केला होता. यातील ८ कोटी समीर वानखेडे यांना द्यायचे  आहेत असे किरण गोसावी सॅम डिसोजाला सांगत असल्याचे ऐकले होते असा, गौप्यस्फोट प्रभाकर साईय याने केला होता. याप्रकरणी आता शाहरुखच्या मॅनेजरचे सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलीसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे आता मुंबई पोलीस पूजा ददलानी आणि आर्यन खानचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *