Mon. Nov 18th, 2019

मासिक पाळीतही करा रक्षाबंधन – सायली संजीव

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

मासिक पाळीतही मंदिरात जा आणि मासिक पाळी असली तरी प्रत्येक सण साजरा करा. खास करून रक्षाबंधन जरूर साजरा करा… असं आवाहन अभिनेत्री सायली संजीव हिने अहमदनगर येथील एका कार्यक्रमात महिलांना केलं आहे. ‘मासिक पाळी- समज गैरसमज’ या कार्यक्रमात तिनं सॅनिटरी नॅपकिन आणि जुन्या परंपरा याबाबत मनमोकळा संवाद साधला.

सायली संजीव ही ‘काहे दिया परदेस’ या गाजलेल्या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनली. या मालिकेतही पुराणमतवादी सासरी स्वागतार्ह बदल करणा-या ‘गौरी’ची भूमिका सायलीने केली होती. सायली प्रत्यक्षातही अगदी तशीच असल्याचं या कार्यक्रमात दिसून आलं. बुरसटलेल्या रुढींना दूर लोटत महिलांनी मासिक पाळीबद्दल जागरूक व्हावं आणि या गोष्टीला वाईट मानू नये, असं सायली म्हणाली.

आजकाल मुलींना खूप लहान वयात मासिक पाळी येते. त्याला आजकालचा आहार जबाबदार आहे. आपण मुलांना काय देतो हे आई वडील पाहतात का, असा सवाल सायलीने केला. फास्ट फूडमुळे प्रॉब्लम निर्माण होत असल्याचंही सायलीने सांगितलं. तर मासिक पाळीबाबत आई वडिलांनी आपल्या मुलीचे डॉक्टर होऊन त्याबाबत मुलींशी संवाद साधला पाहिजे, असाही सल्ला सायलीने दिला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *