Sat. Jun 6th, 2020

पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणात केंद्र सरकारचा काही संबंध नाही – निर्मला सीतारामन

पीएमसी बॅंकप्रकरणात खातेदारांनी भाजपा कार्यलयाबाहेर गर्दी करत घोषणाबाजी केल्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी केंद्र सरकारचा काही संबंध नसल्याचे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.

निर्मला सीतारामन मुंबई दौऱ्यावर असून पीएमसीमधील खातेदारांनी मुंबईच्या भाजपा कार्यलयात आंदोलन केले. आमचे पैसे परत द्या अशी मागणी बॅंक खातेदारांनी निर्मला सीतारामन यांच्याजवळ केली. त्यामुळे केंद्र सरकाराचा काही संबंध नसल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या निर्मला सीतारामन ?

पीएमसी बॅंक घोटळ्याप्रकरणात अनेक खातेदारांचे पैसे अडकले आहेत.

काही माहिती न देता बॅंक बंद पडल्याने खातेदारांचे पैसे अडकले आहेत.

त्यामुळे संतप्त खातेदारांनी मुंबईच्या भाजपा कार्यलयाबाहेर आंदोलन केले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुंबई दौऱ्यावर आहेत.

यावेळी आमचे पैसे परत करा अशी घोषणाबाजी खातेदारांनी निर्मला सीतारामन यांच्यासमोर केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खातेदारांशी बातचीत केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली.

यामध्ये केंद्र सरकारचा काहीही संबंध नसल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.

पीएमसी बँकेच्या खातेदारांची बाजू मी आरबीआयच्या गव्हर्नरसमोर मांडेन.

तसेच हा विषय केंद्र मंत्रालयाचा नसून आरबीआयचा असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *