Mon. Jan 17th, 2022

कोरोना उपचाराचा खर्च करमुक्त ! केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला तर कोरोनामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत कोरोना उपचारांच्या खर्चावर आता कोणताही कर वसुल केला जाणार नाही, असे अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केले आहे.

जर एखाद्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यास किंवा एखाद्या व्यक्तीस कोरोना उपचारांसाठी आर्थिक मदत पुरवली तर ती आर्थिक मदत कर्मचारी आणि लाभार्थीसाठी पूर्णपणे करमुक्त असणार आहे. तसेच कोरोना मृत्यूआधी झालेल्या रुग्णालयाच्या खर्चावरही सरकार कर लावणार नाही. यासंदर्भातील घोषणा वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनाबाधितांना दिलासा मिळणार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचा कुटुंबियांना कंपनीकडून मदत दिली तर ते पूर्णपणे करमुक्त देखील असेल. दोन्ही प्रकारचे फायदे आर्थिक वर्ष २०१९-२० आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *