Sun. Mar 7th, 2021

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा खोळंबली आहे. रेल्वे रुळांलगतच्या कचऱ्याला आग लागल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कळवा रेल्वे स्टेशनजवळच रुळांलगत असलेल्या कचऱ्याला आग लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट रेल्वेमार्गावर आले आहेत. त्यामुळे तातडीने रेल्वे सेवा काही वेळासाठी बंद करण्यात आली. ठाण्याहून आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

आगीमुळे कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. तरीही संभाव्य धोका लक्षात घेऊन काही काळासाठी रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली. संध्याकाळी चाकरमान्यांच्या घरी जाण्याच्या वेळेतच रेल्वे वाहतूक खोळंबल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *