Mon. Jan 18th, 2021

#ManoharParrikar – एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे दीर्घ आजाराने निधन रविवारी निधन झाले.  ते ६३ वर्षांचे होते.  त्यांच्या  निधनाने राजकीय क्षेत्रासह सर्वचं क्षेत्रात शोककळा पसरली आहे.त्यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. सर्व सरकारी अस्थापनांवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाणार आहे.त्यांच्या पार्थिवावर पणजीमध्ये संध्याकाळी5 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळातर्फे सकाळी 10 वाजता बैठक बोलावली असून या बैठकीत पर्रिकरांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. सोमवारी, आज मनोहर पर्रीकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Centre has announced national mourning on March 18, following demise of Goa Chief Minister #ManoharParrikar. State funeral will be accorded to him. National Flag will fly at half-mast in the National Capital & capitals of States & UTs. pic.twitter.com/AD9Fg5jSYD

— ANI (@ANI) March 17, 2019

पर्रीकरांचा शेवटचा प्रवास

सकाळी 9.30 ते 10.30 वाजता पणजीतील भाजपा कार्यालयात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार

सकाळी 10.30 वाजता पर्रीकरांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कला अकादमी येथे नेणार

सकाळी 11 ते दुपारी4 वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार

दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कारासाठी पर्रीकरांचे पार्थिव मीरामार येथे नेण्यात येणार

दुपारी4.30वाजता अंत्यविधीला सुरुवात होईल

संध्याकाळी5वाजता पर्रिकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *