अंबरनाथमध्ये नगराध्यक्षांचं नागरिकांसोबत ‘वॉक पे टॉक’

ठाणे : जगभरात आज 15 डिसेंबर जागतिक चहा दिना साजरा केला जातोय. विविध ठिकाणी चहा महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आलं आहे. या चहा दिनाच्या निमित्ताने अंबरनाथमध्ये नगराध्यक्षांनी जनतेसोबत चाय पे चर्चा केली आहे. या चर्चेद्वारे स्थानिकांनी आपल्या समस्यांचा पाढा नगराध्यंक्षापुढे वाचला. त्यामुळे चहा थंड आणि वातावरण गरम झालेलं पाहायला मिळालं.
आज सकाळी नागरिकांशी ‘चाय पे चर्चा’ या उप्रकमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकरांनी पश्चिमेच्या तीन झाड आणि पूर्वेच्या गावदेवी मैदानात भेट देत नागरिकांशी संवाद साधला.
या संवादात नागरिकांनी अरुंद रस्ते, या आणि अशा अनेक मुद्द्यांवरुन नगराध्यक्षांना धारेवर धरलं. यामुळे सकाळच्या थंडीत गरमागरम चहा घेण्याचा कार्यक्रमात वातावरण गरम झाल्याचं पाहायला मिळालं.
सरतेशेवटी नगराध्यक्षांनी सगळ्या गोष्टीचं खापर प्रशासनाच्या माथी मारुन आपली सुटका केली.
दरम्यान अवघ्या तीन महिन्यांवर अंबरनाथ पालिकेच्या निवडणुका आल्या आहेत.