Mon. Jan 24th, 2022

पुढचे ३ दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

राज्यात थंडीचे दिवस सुरू आहेत मात्र मागील काही दिवसांत राज्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात बरसात होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या तीन दिवसांत राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रातही द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या २४ तासात दक्षिण-पूर्व अरबी समुद्र,मालदीव,लक्षद्वीपमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुढील तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आजपासून पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच राज्याच्या उत्तर भागात हवामान खात्याने उद्या ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *