Jaimaharashtra news

गेल्या 48 तासात चंद्रबाबू नायडू यांनी घेतली विरोधकांची भेट

लोकसभा निवडणुकांचा सातवा म्हणजेच अखेरचा टप्प्यासाठी नुकतचं मतदान संपन्न होत आहे. या निवडणुकांचा शेवटचा टप्प्यातील मतदानानंतर 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान सत्ता स्थापनेसाठी सर्वच राजकिय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. सर्व 21 पक्षांनी मोदी विरोधी एकत्र येण्यासाठी दिल्लीत भेटत आहेत अशी चर्चा होत आहे. गेल्या 48 तासात चंद्रबाबू नायडू यांनी विरोधकांची भेट घेतली आहे.

सत्ता स्थापनेसाठी मोर्चेबांधणी

लोकसभा निडणुकीच्या अखेरच्या म्हणजेच 7 व्या टप्प्यातील मतदान सुरु आहे.

59 जागांवर होत असलेल्या या मतदानानंतर 23  मे रोजी मतमोजणी होवून निकाल येइल.

आज 7 वाजता मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर केला जाईल.

राजकीय पक्षांच्या जागांची परिस्थिती काय असेल याचा अंदाज घेऊन सत्तास्थापनेसाठी पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत.

महाआघाडीची चाचपणी सध्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून सुरु आहे.

त्यासाठी गेल्या २४ तासांत त्यांनी दोनदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे.

तसेच नुकतीच त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी यांची देखील भेट घेतली.

तर संध्याकाळी ते युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत.

यापूर्वी  दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवंद केजरीवाल  यांची सुद्धा  घेतली होती.

Exit mobile version