‘गडकरींच्या दोन साखर कारखान्यांची ईडी चौकशी करा’

‘गडकरींच्या दोन साखर कारखान्यांची ईडी चौकशी करा’ अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे. चौकशी करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे मागणी केली गेली आहे. चंद्रकांत पाटील यांनी ३ जुलैला महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या विक्रीची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केलेल्या मागणीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दोन्ही कारखान्यांचाही समावेश आहे. साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्यासाठी भाजपने आग्रही धरला आहे. त्यात वर्धा जिल्ह्यातील महात्मा सहकारी साखर कारखाना आणि भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. नितीन गडकरींच्या पूर्ती कंपनीने २००९ आणि २०१० मध्ये हे कारखाने लिलावात विकत घेतले होते.