Mon. Apr 19th, 2021

चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलचं सुनवलं…

शरद पवार यांच्यावर टीका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारख – चंद्रकांत पाटील…

भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ सोमवारी इस्लामपूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रकांत पाटीलांना अजित पवार आणि जयंत पाटील यांना चांगलेच टोला मारले आहे.

‘उपमुख्यमंत्री अजित पवार काकांचे गोडवे गाणाऱ्या अजितदादांनी गतवर्षी तीन दिवसांसाठी का होईना काकांना सोडले होते, हा इतिहास त्यांनी निर्माण केला होता आगामी काळात कदाचित राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल तर शरद पवार पुतण्याला नव्हे, तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील असं चंद्रकांत दादानी मेळ्यात म्हटलं. मंत्री जयंत पाटील यांनाही पुढील विधानसभा निवडणुकीत पाहूच, असे आव्हान त्यांनी दिले आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलचं सुनवलं आहे. ते म्हणाले, ‘ओबीसी आरक्षणावरून केलेल्या माझ्या वक्तव्यावरून माझ्यावर पलटवार केले होते. आरक्षणाबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांना फारशी काही माहिती नसल्याचे मी बोललो होतो. मात्र, यावरून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी माझ्यावर टीका केली.

‘माझ्या नावाचे संक्षिप्त रूप ‘चंपा’ असे केले होते. ते आता राज्यभर पसरले आहे. ‘चंपा’चे शरद पवार यांच्याबद्दलचे वक्तव्य म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’, असेच म्हणावे लागेल. ‘शरद पवार या़चा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता मात्र मोदी आणि अमित शाहला काहीही बोलतात हे ठिक आहे का? देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हटलं तर चालते का? शरद पवार यांच्यावर टीका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारख आहे असं बोलत चंद्रकांतदादानी अजित पवार यांना टोला लगवला आहे. अमोल कोल्हे यांना सुद्धा चंद्रकांत दादानी यावेळी सुनवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *