Sat. May 15th, 2021

चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊत यांना टोमणा

“उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. याचा आम्ही निषेध करतो. गावोगावी आम्ही विरोध करू, उदयनराजे यांचे समर्थक ही शांत बसणार नाहीत.  बाळासाहेब ठाकरेंची शिवाजी महाराजांशी त्यांनी तुलना केली होती. याचा विसर बहुदा संजय राऊतांना पडलाय. ती तुलना चुकीची आहे. हे आमचं मत नाही.” अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवडला पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

शरद पवार यांचं रामदास स्वामी आणि शिवछत्रपतींसदर्भातील वक्तव्य म्हणजे इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे.

हा इतिहास त्यांना मान्य नाही, असं दिसतंय.

संभाजीराजे यांना राज्यसभेवर घेतलं तेव्हा पेशव्यांचा संदर्भ दिला होता. तुम्ही काही करत नाही आम्ही केलं की असं बोलायचं.

लाथ मारायची मग सॉरी म्हणायचं, ही पद्धत इंग्रजांनी आणली आहे. आता संजय राऊत सॉरी म्हणत असतील आणि ते काँग्रेसला मान्य असेल. तर आम्हाला काहीच अडचण नाही

भाजप-मनसे युतीबद्दल काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

भाजप आणि मनसे एकत्र येणार की शिवसेनेची वाट पाहताय, याबद्दल बोलताना ‘आम्ही कोणाची वाट पाहत नाही. आमचं काम सुरु आहे.’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मनसेचा जो विचार आहे, त्याबाबत पक्षपातळीवर विचार करू. पण अद्याप त्यांच्याकडूनही तसा प्रस्ताव नाही.

पण अमराठीचा मनसेचा मुद्दा महत्वाचा असल्याचं मात्र चंद्रकांत पाटील यांनी मान्य केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *