Thu. Feb 25th, 2021

चंद्रकांत पाटील यांना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल ; कोथरूड भागात घुसला रानगवा

पुण्यात बुधवारी कोथरुड परिसरात रानगवा घुसल्यानं लोकांची उडाली तारांबळ…

पुण्यात बुधवारी कोथरुड परिसरात रानगवा घुसल्यानं पुण्यात लोकांची तारांबळ उडाली. ही घटना कोथरूड भागात सकाळच्या वेळी घडली रानगवा नागरिकांना दिसल्यानंतर काही नागरिकांनी वन विभागाला याबद्दल माहिती दिली.

रानगव्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न वन विभागाकडून करण्यात आला. मात्र नागरिकांची गर्दी असल्यानं रानगवा हा इकडे तिकडे सोसाट्याने पळत होता. वनविभाग या परिस्थितीचा सामना करत. या रानगवाला इंजेक्शनचा मारा केला भरधाव गव्याला रोखण्यात आले. पण दुर्दैवाने त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. रानगवा ज्या भागात घुसला होता तो मतदारसंघ हा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा होता. त्यानंतर यावरून चंद्रकांत पाटील यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं गेलं.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं ‘याप्रकरणी वन विभागाने हलगर्जीपणा केल्याचे अजिबातच दिसत नाही”, अशी प्रतिक्रिया आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर सोशल मीडियावर टीका करण्यात आली. यासंदर्भात पाटील यांनी उत्तर बुधवारी कोहापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिलं. “माझ्यावर टीका करणे हा नेहमीचाच प्रकार असून त्याला मी अजिबात घाबरत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *