Sat. Apr 17th, 2021

सविंधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही – जयदीप कवाडे

लोकसभा निवडणुकींच्या तारखा काही दिवसांवरच असताना पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचा मुलगा जयदीप कवाडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर टीका केली आहे. स्मृती इराणी संविधान बदलण्याची भाषा करतात, मात्र संविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही असे जयदीप कवाडे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले जयदीप कवाडे ?

जयदीप कवाडे हे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र आहेत.

नागपूरमधून कॉंग्रेसकडून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

निवडणुका जवळ आल्यामुळे नाना पटोले यांनी प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली आहे.

नागपुरातील बगडजंद भागात प्रचारसभेत जयदीप कवाडे यांची जीभ घसरली.

जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर टीका केली आहे.

स्मृती इराणी संविधान बदलण्याची भाषा करत आहे. मात्र संविधान नवरा बदलण्याइतकं सोपं नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

जयदीप कवाडे यांचे भाषण संपवल्यावर नाना पटोले यांनी जयदीपला शाबासकीही दिली.

जयदीप कवाडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *