Sat. May 15th, 2021

Video : ‘पुन्हा शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल बोलाल तर…’, छ. उदयनराजेंचा इशारा

महाराजांची तुलना जगात कोणाशीही होऊ शकत नाही. ज्या महाराजांकडे जग आदर्श व्यक्ती म्हणून पाहते त्यांची तुलना या ना त्या कारणाने केली जातेय. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का? अशा शब्दांत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सर्वच राजकीय पक्षांना इशारा दिलाय. मात्र यावेळी त्यांचा मुख्य रोख भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर होता. शिवरायांच्या नावाचा वापर करणाऱ्यांना उदयनराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपल्या खास स्टाईलमध्ये दम भरलाय.

शिवाजी महाराजांची तुलना सोडून द्या त्यांच्या जवळपासही कोणी जाऊ शकत नाही. आज छत्रपती घराण्यात जन्माला आलो याचा मला अभिमान आहे. महाराजांचे वंशज म्हणून नावाचा दुरुपयोग केला नाही, राजेशाही गेली लोकशाही आम्ही मान्य केली असं उदयन राजेंनी स्पष्ट केलं.

जाणता राजाउपाधीवर उदयन राजेंचा पवारांना सवाल

महाराज जाणता राजा होते. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच होते दुसरा कोणी नाही

कुणाला उपमा देताना पुन्हा एकदा विचार करावा, असं म्हणत शरद पवारांना जाणता राजा म्हणण्यावरून उदयन राजे यांनी राष्ट्रवादी पक्षाला टोला लगावला. घड्याळाचे दिवस संपलेत असा इशाराही त्यांनी दिला.

शिवसेनेचं नाव ठाकरेसेना करा

उदयनराजेंनी शिवसेनेवरही सडकून टीका केली. महाविकास आघाडी मधून ‘शिव’ नाव का काढलं, असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला. वडापावला शिवरायांचं नाव का दिलं?  शिवसेना जेव्हा काढली तेव्हा आम्हाला विचारलं होतं का, असा प्रश्न विचारत शिवसेनेचं नाव बदलून ठाकरे सेना करा असं उदयनराजे म्हणाले.
शिवसेनेला आम्ही कधी विरोध केला नाही. आम्ही वंशज असलो तरी, विचारांचा वारसा देशाला लाभला आहे.शिवाजी महाराजांनी कधी मतभेद केले नाहीत. मुंबईमध्ये दादर इथे शिवसेना भवन आहे. तिकडे बघा महाराज कुठे आहेत आणि बाळासाहेब ठाकरे कुठे आहेत पहा, असंही त्यांनी म्हटलंय. शिवसेनेने जेम्स लेनच्या वेळी शिवाजी महाराजांविषयी आत्मीयता कुठे गेली होती.सोयीनुसार ते महाराजांचा वापर करतात, असं उदयनराजे म्हणाले.

वंशज म्हणून आमच्यावर सारखी टीका करता, असं म्हणत शिवाजी महाराजांचीच शिकवण आम्ही पाळत आलो आहोत. सत्तेसाठी आम्ही काही करत नाही. जे बुद्धीला पटत नाही ते करत नाही असं उदयनराजे यांनी म्हटलंय.

माझं नाव उदयनराजे आहे.माझी नाळ आणि नात सर्वसामान्यांशी आहे.

उठसुठ राजे परिवारावर टीका करायची, वंशज म्हणून आमच्यावर सारखी टिका करायची, सर्वाना सांगतो आमच्यावर टीका करता, आम्ही बांगड्या घातल्या नाहीत हे लक्षात ठेवा.

स्वार्थ मनात ठेवून एकत्र आलेले लोक फार काळ एकत्र राहत नाही. स्वार्थ साधला की निघून जातात. राज्याचा खेळखंडोबा झालाय. शेतकरी मरायला लागलेत आणि यांची मोठ्या हॉटेलात पळवापळवी सुरू होती, असं म्हणत उदयनराजेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

परत राजेंच्या वंशजावर बोलला तर जनत टांगून मारेल. तेव्हा माझ्याकडे येऊ नका असा दम उदयनराजेंनी भरला.  माझ्याबद्दल काय म्हणायचं ते म्हणा, कोणी काही बोलले तरी मला फरक पडत नाही. असंही उदयनराजे म्हणाले.

मी लोकांचं हित लक्षात घेऊन वाटचाल असते,भ्रष्टाचाराचा विरोधात तर आहेच, माझा राजीनामा मागण्याऐवजी यांचा घ्या, देश राज्य सुखी होईल असं उदयनराजे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *