Wed. Aug 5th, 2020

पर्रिकर अत्यंत उत्कृष्ट संरक्षणमंत्री – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कॅन्सरशी झुंज देत असताना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधन झाले. यावर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्रिकर हे गोव्याचे खरे सुपुत्र होते, त्यांनी त्यांच्या सेवेत जबाबदा-या आणि भूमिका चोख बजावल्या होत्या, अशा शब्दात ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.सोबतच पर्रिकर हे अत्यंत उत्कृष्ट संरक्षणमंत्री आहेत, यामध्ये काही शंकाच नाही, असेही ट्विट त्यांनी  केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिला पर्रिकरांच्या आठवणींना उजाऴा

मला पर्रिकर यांच्या संपर्कात येण्याच्या आणि त्यांच्यासोबत काम करण्याच्या अनेक संधी मिऴाल्या आहेत.

अगदी सुरूवातीपासूनच ते अलिकडेच गोवा मधील सऴीगाव येथील हिंदुस्तान वेस्ट प्रोग्रामला  देखील मी भेट दिली.

पर्रिकर हे गोव्याचे खरे सुपुत्र होते.त्यांची वचनबद्धता आणि दृष्टी मला नेहमीच प्रेरणादायी आहे.

त्यांनी त्यांच्या सेवेत जबाबदा-या आणि भूमिका चोख बजावल्या होत्या.

पर्रिकर हे अत्यंत उत्कृष्ट संरक्षणमंत्री आहेत.यामध्ये काही शंकाच नाही.

आता फक्त आठवणी उरल्या आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पर्रिकरांच्या आठवणींना उजाऴा दिला.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या कुटुंब,मित्रपरिवार आणि स्थानिकांचे मी सांत्वन करतो.अशी श्रद्धांजली ट्विटवर वाहिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *