Fri. Feb 21st, 2020

नाशिककरांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांची ‘ही’ घोषणा

पुणे नागपूरनंतर नाशिकमध्ये देखील मेट्रो सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील वेगवेगळ्या विभागाचा आढावा बैठक घेतला. ‘नाशिकला मी दत्तक घेतले असून, त्यावर माझे बारीक लक्ष आहे’ असंही मुख्यमंत्री म्हणाले.

तसंच शहराच्या करवाढीने समर्थन करीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही पाठींबा व्यक्त केला.

– नाशिक जिल्ह्यात 9 हजार शेततळे कामं पूर्ण
– गाळमुक्त धरण हा कार्यक्रम हाती घेणार
– राज्यातील दुष्काळ आणी टंचाई अहवाल 31 ऑक्टोबर पर्यंत तयार होणार
– राज्यात आतापर्यंत 77 टक्के पाऊस
– काही भागात मात्र पाणी साठा अत्यंत कमी
– या भागात टंचाईची परिस्थिती
– आवश्यकतेनुसार राज्य सरकार मदत करणार
-नाशिकमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत 23 हजार घरं पूर्ण
– या वर्षाखेर 30 हजार घरांचा कोटा
– या योजनेत नावं सुटलेल्या लोकांचा पुन्हा आढावा घेणार स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटेलाईट टाऊनशीप म्हणून विकास करण्याचं नियोजन
– जे प्रोजेक्ट जाहीर केले ते करणारच काही कालावधी लागला तरी पूर्ण करणार
– *मी नाशिकला दत्तक घेतलंय *दत्तकपुत्रकडे दुर्लक्ष नाही*
– बससेवेची फिजीबलिटी तपासण्यात आली आहे
– बससेवा ही तोट्यातच चालते
– मात्र नागरिकांना सुविधा मिळणं महत्वाचं
– नाशिक जिल्ह्यात गुन्हा उघडकीस रेशो वाढलाय
– कनव्हीक्शन रेटमध्ये समाधानकारक वाढ
– महिला सुरक्षितता महत्वाची
– अवैध धंद्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश
– पोलीस वसाहत साठी निर्देश
– स्मार्ट सिटीसाठी 2300 कोटी रुपयांचे 50 प्रोजेक्ट सुरू
– नाशिकची प्रगती होतेय
– गोदावरी नदी 416 कोटींचा मूळ प्रोजेक्ट
– याकरीता काम सुरू
– शहरात 800 cctv कॅमेरे,वायफाय, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट काम 3 महिन्यात
– नाशकात कमांडन्ट कंट्रोल सिस्टीम
– शहरात 400 बस वाहतुकीसाठी
– यात 200 इलेक्ट्रिक बस, इतर बससाठी CNG बस प्रस्तावित
– शहरात मेट्रो धावणार
– लवकरच प्रकल्प पाहणी अहवाल
– नागरी सेवा देण्यासाठी पालिकेला कर आकारणी करावी लागणारच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *