Thu. Oct 22nd, 2020

‘असा’ होता मनोहर पर्रिकरांचा जीवनप्रवास

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी वयाच्या 63 वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनोहर पर्रिकर यांची प्रकृती शनिवारपासून खालावली होती. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी मनोहर पर्रिकर यांचे निधन झाल्याची बातमी ट्विटरच्या माध्यमातून दिली. गेल्या वर्षी पर्रिकर यांनी स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता. त्यांच्यावर अनेक उपचारही करण्यात आले होते. या कर्करोगावर मनोहर पर्रिकर यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालय, अमेरिका आणि दिल्लीच्या एम्समध्ये उपचार घेतले होते.त्यांच्या निधनाची माहिती मिळाताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली.

मनोहर पर्रिकर यांचा जीवनप्रवास –

गोव्यातला सर्वात लोकप्रिय मराठी चेहरा.

साधी राहणी, हसऱ्या चेहऱ्याचे पर्रिकर गोव्यात लोकप्रिय.

13 डिसेंबर 1955 मध्ये मापुसा गावात जन्म.

तरुणपणापासून संघाशी जुळले.

मुंबई आयआयटीमधून धातूशास्त्र इंजिनीअरींगची पदवी घेतली.

पदवी पुर्ण झाल्यानंतर पुन्हा संघाचे प्रचारक म्हणून काम केले.

1994 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून विजयी.

1999 मध्ये विरोधी पक्ष नेतेपदी निवड.

2000 मध्ये गोव्याचे मुख्यमत्री म्हणून निवड.

2001 मध्ये पत्नी मेधा यांच निधन झाले.

पर्रिकरांनी आतापर्यंत चारवेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलं.

2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या आग्रहामुळं केंद्रात संरक्षण मंत्रीपद स्विकारले.

मात्र पर्रिकर कधीच केंद्राच्या राजकारणात रमले नाही.

2017 मध्ये गोव्याच्या राजकारणात पुन्हा परतले.

27 ऑक्टोंबर 2018 मध्ये पर्रिकरांना स्वादुंपीडाचा कर्करोग झाला

अमेरिकेत उपचार घेऊन भारतात परतले.

त्यानंतर पर्रिरकर आजतागायत आजारीच होते.

मध्यंतरी पर्रिकर काही बैठकीला उपस्थित राहीले, त्यांनी विधानसभेत बजेटही सादर केले.

मात्र 17 मार्च 2019 रोजी म्हणजेच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *