‘सुशांतसिंग राजपूत मृत्यूला मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव जबाबदार’ – नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत. ‘सुशांतसिंग राजपूत, दिशा सालीयान मृत्यूला जबाबदार मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत’, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
सुशांतसिंग राजपूत, दिशा सालीयान मृत्यूला मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव जबाबदार आहेत. तसेच त्यांच्या खुनाचे पुरावेदेखील दिले आहेत. मात्र कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. या मृत्यूचे जबाबदार मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत म्हणून त्यांना अटक होत नाही, असा थेट आरोप नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे.
पूजा चव्हाणप्रकरणी संजय राठोड यांनी पराक्रम केला आहे. त्यामुळे हे सरकार किती खून पचवणार असा थेट सवाल सावंतवाडी येथील भाजपा कार्यकर्त्याच्या बैठकीतून नारायण राणे यांनी केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीदरम्यान मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, भाजप महिला जिल्हाध्यक्ष सध्या तेरसे आणि पदाधिकारी उपस्थित होते.