विधानसभेसाठी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा

काही महिन्यावर विधानसभा निवडणुका ठेपल्या असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ऑगस्ट महिना महाजनादेश यात्रा काढणार असल्याचे सांगितले आहे. 1 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत महाजनादेश यात्रा काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
महाजनादेश यात्रा 1 ऑगस्टपासून सुरूवात –
विधानसभा निवडणुकांसाठी भाजप महाजनादेश यात्रा काढणार आहे.
राज्यातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महाजनादेश यात्रा काढत असल्याचे म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश काढणार आहे.
विदर्भातल्या मोजरी गावातून यात्रेला सुरुवात होणार आहे.
30 जिल्हे, 25 दिवस, 4200 किमी, 104 जाहीर सभा, 228 स्वॉगत सभा घेणार आहेत.
25 दिवस ही महाजनादेश याञा सुरू राहणार आहे.