मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे एका क्लिकवर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांन राज्यातील जनतेला मार्गदर्शन केलं. तसंच त्यांनी कोरोनासंदर्भातील अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
आरोग्यसेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त वॉर्डबॉय, परिचारिका तसेच प्रशिक्षित लोकांना मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. या संकटकाळात मदत करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी एक मेल आयडी दिला आहे. ..Covidyoddha@gmail.com या मेलआयडीद्वारे संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
सर्दी,खोकला, ताप असलेल्यांनी तापासाठीच्या विशेष रुग्णालयात जाऊन तपासणी करा..ही तपासणी केंद्र प्रत्येक विभागात असतील !
एकमेकांचे मास्क वापरू नका ..फेकून द्यायचे मास्क फेकण्यापूर्वी जाळून टाकून त्याची राख सुरक्षित ,मोकळ्या जागेत टाका !
केंद्राकडे तांदुळाप्रमाणेच इतरही धान्याची केंद्राकडे मागणी केली आहे..केशरी शिधापत्रकधारकांना 3 किलो गहू 8 प्रति किलो दराने तर 2 किलो तांदूळ 12 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध केला जात आहे !
साडेपाच ते सहा लाख लोकांना आपण तीन वेळचे अन्न देत आहोत..अन्नदानावेळी यामध्ये जात,पात, धर्म आपल्या राज्यातला का बाहेरचा याचा विचार करत नाही !
घरी राहा तंदुरुस्त राहा, ज्यांना शक्य असेल त्यांनी घरातल्या घरात व्यायाम करा..युद्ध जिंकल्यानंतर अर्थव्यवस्थेसंदर्भातील युद्धासाठी आपण तयार पाहिजे !
महाराष्ट्रात 610 लोकांना आजाराची सौम्य लक्षणे आहेत. 26 जणांना गंभीर स्वरुपाची लक्षणे आहेत.
दरम्यान राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री सातत्याने राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. राज्यातील जनतेला दिलासा देत आहेत.