Tue. Nov 24th, 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पोलिसांच्या सदनिकांचं भूमीपूजन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मरोळमधील पोलीस कर्मचाऱ्यांकरीता सदनिकांचं भूमीपूजन पार पडलं.

यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, महाराष्ट्र पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे उपस्थित होते.

अंधेरीतील मरोळ पोलीस वसाहतीतील कर्मचाऱ्यांसाठी 7 मजल्यांच्या एकूण 16 इमारती बांधण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी सुमारे २२५ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

यात एकूण 448 सदनिकांचा समावेश असणार आहे. यामध्ये प्रत्येकी 484 स्क्वेअर फुट कार्पेट एरियाचं घर देण्यात येणार आहे.

यामध्ये प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वस्तीगृह आणि क्रीडासंकुल अशा सर्वसुविधा असणार आहेत.

या भूमीपूजन कार्यक्रमाआधी उद्धव ठाकरेंनी पोलीस स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन संचालन सभारंभ मरोळच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात पार पडला.

२ जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

पोलीस वर्धापन दिनानिमित्त संचलन ही करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांना पोलिसांकडून मानवंदना दिली गेली.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

पोलिसांसाठी आजचा मोठा दिवस आहे. हर्ष परेड आहे. पोलिसांसाठी जे जे करता येईल ते मी करेन, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

पोलिसांचे संचलन आणि मानवंदना यांचा सन्मान स्वीकारण्याची संधी मिळाली. हा माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा असल्याचे मुख्यंमंत्री म्हणाले.

पोलिसांना शस्त्र, चांगली घरं देण्यासाठी प्रयत्न करणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पोलिसांचं वर्ष तणावमुक्त जावो, अशा शुभेच्छा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *