मुख्यमंत्री उद्योगपतींशी औद्योगिक धोरणांवर संवाद साधणार

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची सू्त्रं हातात घेतल्यानंतर अनेक निर्णयांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री आज मंगळवारी राज्यातील उद्योगपतींशी संवाद साधणार आहेत.
ही बैठक सह्याद्री या शासकीय अतिगृहावर पार पडणार आहे. संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होणार आहे.
या बैठकीला रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासह अनेक प्रसिद्ध उद्योगपती उपस्थितीत असणार आहेत.
राज्य सरकार आणि सीआयआयच्या संयुक्त विद्यमानाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई देखील हजर असणार आहेत.
या बैठकीत मुख्यमंत्री उद्योगपतींसमोर राज्याच्या विकासाबाबतची भूमिका मांडतील.
तसेच विकास आरखडा तयार करताना उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचना घेतल्या जाणार आहेत. या सूचना अंमलबजावणी करताना उपयोगात आणल्या जाणार आहेत.
दरम्यान काल सोमवारी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील गड किल्ल्यांच्या फोटो आणि व्हिडिओग्राफी स्पर्धेचं आयोजन केलं आहे.