Mon. Feb 24th, 2020

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.

पंतप्रधानांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत, अशी विनंती ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

पत्रात काय म्हणाले मुख्यमंत्री ?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव 16 नोव्हेंबर 2013 ला प्रस्ताव सादर करण्यात आला.

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक असलेले निकष मराठी भाषा पूर्ण करते.

अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करुन देखील हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित आहे.

संबंधित विभागाने सदर प्रकरण साहित्य अकादमीच्या भाषा समितीकडे विचारार्थ असल्याचे कळवले आहे. बराच कालावधीपासून हे प्रकरण प्रलंबित आहे.

त्यामुळे या प्रकरणात आता पंतप्रधानांनी लक्ष घालावे. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना पत्राद्वारे केली आहे.

आतापर्यंत तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि उडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

अभिजात भाषा असल्याचे निकष काय असतात ?

संबंधित भाषा ही प्राचीन असावी त्या भाषेचं साहित्य श्रेष्ठ असावे. त्या भाषेचं वय हे दीड ते अडीच हजार वर्ष इतकं असावं.

भाषा स्वयंभूपण असावी. प्राचीन भाषा आणि भाषेचा आधूनिक गाभा हा कायम असायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *