Fri. Feb 21st, 2020

दिवाळीला बनवा ‘हे’ खास फराळ

दिवाळी हा दिव्यांचा सण मानला जातो. पण त्यासोबत फराळालाही तितकेच महत्त्व आहे. फराळ म्हटलं की, प्रत्येकाच्य़ा तोंडात येतं ते म्हणजे चकली, चिवडा आणि लाडू. मात्र दरवर्षी तेच पदार्थ बनवून आणि खाऊन तुम्ही पण कंटाळला असाल. आज आम्ही तुम्हाला काही वेगळ्या दिवाळी पदार्थांची रेसीपी सांगणार आहे. जे वाचून नक्कीच तुमची दिवाळी आनंदाची ठरेल.

चिरोटे –

साहित्य –

  • चिरोटेसाठी – 1 कप मैदा, ¼ कप रवा, ¼ कप पाणी, 1 चमचा तेल, 2 चमचे तांदळाचे पिठ. तूप/लोणी.
  • पाकासाठी – ¾ कप साखर, ¼ पाणी, 1 चमचा लिंबाचा रस.

कृती – 

  • एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करा. नंतर एका बाऊलमध्ये मैदा, रवा आणि गरम तेल एकत्र करा. त्यामध्ये पाणी घालून ते एकजीव करून घ्या.
  • ते मिश्रण एक-दोन तास झाकून ठेवावं. नंतर त्य़ा कणकेच्या चपात्या लाटाव्या. पहिली चपाती लाटल्यानंतर त्यावर तूप किंवा लोणी लावावं. त्यानंतर तांदळाचं पीठ लावावं. त्यावर दुसरी चपाती ठेवावी. तसंच तूप/लोणी लावून तिसरी चपाती ठेवावी.
  • नंतर चपाती गुंडाळून घ्यावी. मग त्याचे छोटे तुकडे करायचे. आणि ते पुरीच्या आकारात लाटावे. नंतर तळून घ्यावे. तळल्यानंतर चिरोटे पाकात भिजवावे किंवा त्यावर पीठी साखर टाकावी.

पाक बनवायची कृती-

  • पाक बनवण्यासाठी एका भांड्यात ¼ पाणी आणि ¾ कप साखर मिक्स करा. सहा ते सात मिनिटं हे मिश्रण गॅसवर गरम करावं. मिश्रण थोडं जाडसर झाल्यावर त्य़ामध्य़े लिंबू मिक्स करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *