Sun. Jul 5th, 2020

‘येथे’ 150 वर्षांपासून आहे ‘चोर गणपती’ बसवण्याची परंपरा !

श्री गजानन हे सांगलीचं आराध्य दैवत. मात्र येथे एक वेगळी परंपरा 150 वर्षांपासून सुरू आहे. ही परंपरा म्हणजे ‘चोर गणपती’ बसवण्याची. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आगोदर या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिध्द गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो.

गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचं आगमन होतं.

सांगलीत मात्र दोन दिवस अगोदर गणेशाचं आगमन होतं.

हा गणपती वाजत गाजत येत नाही. उलट कुणालाही माहिती न पडता गणेशाची स्थापना होते.

म्हणून या प्रथेला चोर गणपती म्हणतात.

भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या काळात हा गणपती बसवला जातो.

सांगली मध्ये ही गेल्या दीडशे वर्षापासून परंपरा सुरु आहे, चोर गणपतीची मूर्ती कागदी लगद्यापासून बनवली जाते. हा गणपती दीड दिवस असतो. या मूर्तीचं विसर्जन केलं जात नाही. या मूर्तीचं सुखरूप जतन केलं जातं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *