Mon. Jan 24th, 2022

नवाब मलिकांविरोधात एक हजार कोटींचा दावा

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय सदस्य समीर वानखेडे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. दरम्यान आता मलिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नवाब मलिकांविरोधात एक हजार कोटींचा दावा दाखल केला आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुंबई उच्च न्यायालयात मलिकांविरोधात एक हजार कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. मुंबै बँकेची बदनामी केल्याचा आरोप नवाब मलिकांवर करण्यात आला आहे. मलिकांनी बँकेविरोधात खोटी माहिती पसरवल्यामुळे मुंबै बँकेच्या प्रतिमेस हानी पोहचवल्याचा आरोप मलिकांविरोधात केला आहे. त्यामुळे मुंबै बँकेने नवाब मलिकांविरोधात एक हजार कोटींचा दावा दाखल केला.

काय आहे प्रकरण? 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे या बँकेचे अध्यक्ष आहेत. नवाब मलिकांनी जुलै महिन्यात बँकेची बदनामी करणारे होर्डिंग मुंबईतील रस्त्यांवर लावले होते. त्यामुळे मुंबईत बँकेची प्रतिमा मलिन झाली असल्यामुळे मलिकांविरोधात बँकेने एक हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

नवाब मलिकांनी बँकेचे होर्डिंग लावल्यामुळे एका भ्रष्टाचारी बँकेचे चित्र मुंबईतील बँक ग्राहकांसमोर उभे झाले. त्यामुळे ज्या ठिकाणी होर्डिंग लावले होते त्याच ठिकाणी होर्डिंग लावून माफी मागण्यात यावी, असे दाव्यात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *