Tue. Nov 24th, 2020

मी सुखरूप आहे, काळजी करण्याचं कारण नाही – मुख्यमंत्री

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

लातूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. निलंगा हेलिपॅडवरून उड्डाण करताना हेलिकॉप्टर कोसळले आणि विजेच्या तारांना हेलिकॉप्टरचा पंखा

अडकला.

 

मुख्यमंत्र्यांसह 4 जण या हेलिकॉप्टरमध्ये होते. सर्व जण सुखरूप असून मुख्यमंत्र्यांच्या हाताला खरचटले. दरम्यान मी सुखरूप आहे, काळजी करण्याचं कारण नाही,

असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

मुख्यमंत्र्याचे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर हे केवळ तीन वर्षआधीच सेवेतं आले. पायलटच्या प्रसंगावधानामुळेच मोठा अनर्थ टळला आणि केवळ काही

खरचटण्यावर निभावले. अपघात घडला त्यावेळी नेमकं काय परिस्थिती होती. याची माहिती अपघातग्रस्त हेलिकॉप्टपरच्या कॅप्टनने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *