Thu. Nov 26th, 2020

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा जीवनपट छायाचित्रातून उलगडणाऱ्या ‘उडान’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन वरळीच्या ‘एनएससीआय’ सभागृहात झाले.

 

यावेळी व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी आणि सिनेदिग्दर्शक करण जोहर उपस्थित होते. तर, सभागृहात राजकारण, उद्योग, कला आणि क्रीडा विश्वातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितले की, शरद पवारांची माफी मागून बोलतो की महाराष्ट्रात राष्ट्रवादी आहे पण गोंदीया मध्ये पीपीपी आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षातले नेते असं म्हणताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि व्यासपाठीवरही एकच हशा पिकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *