Thu. Jan 20th, 2022

वाहतूक पोलिसांना सहकार्य करा, मुंबई पोलिसांचं आवाहन

जगभरासह देशात आणि मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. थर्टी फर्स्टला अनेक तरुण दारू पिउन बेदरकारपणे गाड्या चालवतात.

या अतिउत्साही तरुणांमुळे अपघात होतात. यामुळे अनेकांना कुटुंबातील सदस्यांना मुकावे लागते.

कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो.

मुंबई पोलिसांनी थर्टी फस्ट आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ ट्विट करुन मुंबईकरांना आवाहन केले आहे.

नववर्ष नव विचार आणि आचारांनी फुलवा, असा संदेश मुंबई पोलिसांनी दिला आहे.

अधिक वाचा : थर्टी फस्ट आणि न्यू इअरसाठी पश्चिम रेल्वे चालवणार विशेष रेल्वे

दारु पिऊन गाडी चालवणं म्हणजे आपल्या कुटुंबाला एकटं सोड्यासारखं आहे.

सुरक्षित प्रवासासाठी सतर्क राहणाऱ्या वाहतूक पोलिसांना सहकार्य करा. या शब्दात मुंबई पोलिसांनी जनतेला आवाहन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *