‘कोस्टल रोड प्रकल्पात घोटाळा’ – आशिष शेलार

भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबई कोस्टल रोड प्रकल्पावरून मुंबई महानगर पालिकेवर आरोप केले आहेत. राज्याच्या कोस्टल रोड प्रकल्पात महापालिका घोटाळा करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच कोस्टल रोड प्रकल्पासंदर्भात अनागोंदी कारभार सुरू असल्याचेही शेलार म्हणाले.
मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि जलद प्रवास करण्यासाठी देशातील पहिल्या ‘कोस्टल रोड’चे काम सुरू करण्यात आले. २०१०मध्ये कोस्टल रोडची योजना पुढे आली होती. भाजप आमदार आशिष शेलार यांनी कोस्टल रोड प्रकल्पात अनागोंदी कारभार सुरु असल्याचा आरोप केला आहे. शेलार म्हणाले, मी या आधी ६ सप्टेंबर आणि २ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेतली होती. तसेच या कोस्टल रोड प्रकल्पाबाबत काय सुरू आहे हे जनतेसमोर आणणे महत्त्वाचे असल्याचे शेलार यांनी सांगितले.
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाला आहे. कोणतेही काम न करता कंत्राटदाराला पैसे देण्यात आले. माझ्याकडे पुरावे आहेत, ते त्यांनी बघावे. तसेच मी कधीही आक्षेपार्ह विधान केलेले नसल्याचे आशिष शेलार म्हणाले.