Sat. Apr 17th, 2021

कसं असेल 20 रुपयाचं नाणं?

लवकरच 20 रुपयांचं नाणं चलनात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. मार्चमध्येच खरंतर 20 रुपयांच्या नाण्यांसंदर्भात घोषणा झाली होती. सध्या चलनात 10 रुपयाचं नाणं आहे, तसंच आता 20 रुपयांचंही नाणं चलनात येणार आहे.

काय आहे 20 रुपयाच्या नाण्याचं वैशिष्ट्य?

या नाण्याला 12 किनार असतील.

नाण्यांच्या काठांवर कोणतंही डिझाईन नसेल.

एका बाजूला अशोकस्तंभाचं निशाण असून त्याखाली ‘सत्यमेव जयते’ अशी अक्षरं असतील.

दुसऱ्या बाजूला 20 रुपये लिहिलेलं असून धान्याचं प्रतीक असेल.

नाण्याचा आकार 27mm असेल,

नाण्याच्या रिंगमध्ये 65% तांबे, 20% निकेल तसंच 15% जस्त असेल.

या नाण्याचं वजन 8.54 ग्रॅम असेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *