Thu. Nov 26th, 2020

5 मिनिटांत बुडाली 5 मजली बोट; 9 जणांचा मृत्यू,तर 30 जण बेपत्ता

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

कोलंबियातील मेडेलिन जवळच्या समुद्रात रविवारी पाच मजली बोटीला 5 मिनिटात जलसमाधी मिळाली आहे.

 

यावेळी बोटीवर जवळपास 150 पर्यटक प्रवास करत होते. यातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 जण अजूनही बेपत्ता आहेत.

 

अल-अल्मीरांते नावाचं हे बोट मेडेलिनपासून 45 किलोमीटर आत समुद्रात बुडाले. या बोटीतील 21 जण गंभीर जखमी असून, 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

तर 30 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून बचावाचं कार्य करण्यात येत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *