अर्णब गोस्वामीच्या अटकनंतर कुणाल कामरानी ट्विट करुन दिला उपरोधिक टोला
कुणाल कामराच लक्षवेधी ट्विट…

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. अर्णब गोस्वामी याच्या अटकनंतर भाजप नेत्यांनमध्ये आटापिटा सुरू आहे. ही कारवाई अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी झाली आहे. अन्वय नाईक यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीत त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला होता.
त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहे. यातच संपूर्ण प्रकरणावर प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपा रिपब्लिक टीव्हीवर फ्रीमध्ये जाहिरात करुन घेतय” असा टोला त्याने लगावला आहे. यापुर्वी देखील कुणाल कामराने अर्णब गोस्वामींवर टीका केली आहे. कुणाल कामरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो.
“अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर त्यांचे समर्थक भाजपा आणि एबीवीपीचे झेंडे घेऊन रिपब्लिक वृत्तवाहिनीवर येऊ लागले. भाजपा रिपब्लिक टीव्हीवर स्वत:ची मोफत जाहिरात करुन घेत आहे.” अशा प्रकारचं ट्विट करुन कुणालने उपरोधिक टोला लगावला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी आपल्या राहत्या घरी अलिबाग येथे आत्महत्या केली होती.
अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी सुसाईड लिहिलं होती त्या नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं आहे. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे तर याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र सध्या अर्णब गोस्वामी यांच्या चांगल्याच अडचणी वाढत दिसत आहे.