Thu. Jan 20th, 2022

त्या व्हिडिओशी आमचा संबंध नाही- भाजप

वादग्रस्त पुस्तकावरुन वाद शमतो न शमतो, त्यानंतर आज नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पोलिटिकल कीडा या ट्विटर अकाउंटवरुन एक वादग्रस्त व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.

या प्रकरणावरुन आता भाजपने आपली भूमिका मांडली आहे.

पॉलिटिकल कीडा या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलेला व्हीडीओशी भाजप पक्षाचा कोणताही संबंध नाही.

तसेच तो भाजपचा अधिकृत व्हिडिओ नसल्याचंही भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

शिवाजी महाराजांची कोणाचीही तुलना करण्याचे भाजपा कधीही समर्थन करणार नाही, अशी भूमिका भाजपने स्पष्ट केली आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणावरुन भाजप आमदार राम कदम यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबतचा एक व्हिडिओ राम कदम यांनी ट्विट केला आहे.

भाजपाशी संबंधित नसलेले मुद्दे उपस्थित करून संजय राऊत यांना अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देण्यास कदाचित घाबरून पळ काढण्यासाठी असे मुद्दे उपस्थित करण्याची गरज भासली असेल.

हा प्रकार स्वत:चे शेपूट लपवून उड्या मारण्यासारखा आहे. असं राम कदमांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तसेच चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या ट्विटर खात्यावरुन भूमिका सपष्ट केली आहे.

काय आहे प्रकरण ?

पोलिटिकल व्हिडिओ या ट्विटर पेज वरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा तर तानाजी यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला.

तसेच उदयभान राठोड यांच्या चेहऱ्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा चेहरा लावण्यात आला. त्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

दरम्यान खासदार छत्रपती संभाजीराजेंनी हा सर्व प्रकार निंदनीय असल्याचं म्हटलं आहे. या सर्व प्रकरणाबाबत त्यांनी ट्विट केलं. या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *