Thu. May 19th, 2022

झिशान सिद्दिकांची भाई जगतापविरोधात तक्रार; सोनिया गांधींना लिहिले पत्र

  काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या जनजागरण पदयात्रेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांच्यात खटका उडाला. दरम्यान मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वांद्रे पश्चिम भागातले काँग्रेस नेता झिशान सिद्दिकी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार करणारे पत्र सोनिया गांधी यांना लिहिले आहे.

  १४ नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या एका पदयात्रेत या दोघांच्यात झालेल्या गोंधळासंदर्भाने हे पत्र लिहिण्यात आले. झिशान सिद्दीकी यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘मुंबईत १४ नोव्हेंबर रोजी एका पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेदरम्यान भाई जगताप यांनी माझ्याशी गैरवर्तणूक केली. त्यांनी माझ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. मला धक्काबुक्की केली आणि शेकडोंच्या गर्दीसमोर माझा अपमान केला. त्यावेळी पक्षाची प्रतिमा अबाधित राखण्यासाठी मी काही बोललो नाही. पण माझी मागणी आहे की, भाई जगताप यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. असे पत्र लिहीत भाई जगताप यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी झिशान सिद्दीकी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.