संचारबंदीबाबत मुंबई पोलीसांनी केलं निवेदन प्रसिद्ध
चारपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणं टाळण्याचं आवाहन…

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्यानं जगात भीतचं वातावरण निर्माण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात जागोजागी खबरदारी घेण्यात येत आहे. केंद्रकडून मिळालेल्या आदेशानुसार सर्व गोष्टीची खरबदारी घेतली जात आहे. उपाय म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु अर्थात रात्रीच्या संचारबंदीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.
या आदेशाबाबतीत सर्वसामान्यामध्ये संभ्रम असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे मुंबई पोलीसांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्या निवेदनात मुंबईत रात्रीची संचारबंदी असली तरी नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे. मात्र, चारपेक्षा अधिक लोकांची गर्दी करता येणार नाही. जर नियमाचे उल्लंघन केलं तर कारवाई करण्यात येणार आहे. असं या निवेदनात आहे. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.