Sun. Apr 18th, 2021

…अखेर काँग्रेसला नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात उमेदवार सापडला!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध अखेर काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. माजी आमदार आशिष देशमुख हे मुख्यमंत्र्यांना नागपूर दक्षिण – पश्चिम विधानसभा मतदार संघातून काँग्रेस तर्फे येत्या निवडणुकीत आव्हान देणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध अखेर काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. माजी आमदार आशिष देशमुख हे मुख्यमंत्र्यांना नागपूर दक्षिण – पश्चिम विधानसभा मतदार संघातून काँग्रेस तर्फे येत्या निवडणुकीत आव्हान देणार आहेत.

राज्याचे माजी मंत्री,ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे चिरंजीव असलेले डॉक्टर आशिष देशमुख 2014 साली भाजपकडून काटोल विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. परंतु ते भाजप मध्ये काही रमले नाही. स्वतंत्र विदर्भ,शेतकरी समस्या,बेरोजगारी या विषयावर त्यांनी भाजप सरकारलाच धारेवर धरले. या मुद्द्यांवर त्यांनी अनेकदा भाजपच्या राज्य आणि केंद्रीय नेतृत्वावर जाहीर टीकाही केली.

शेवटी ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांनी भाजपला सोडचिट्ठी देत आमदारकीचाही राजीनामा दिला. ऑक्टोबर 2018 मध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सेवाग्राम येथे काँग्रेस मध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही ते नागपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध लढण्यास तयार होते तसे त्यांनी बोलूनही दाखवले होते.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध ते निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. परंतु काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावरही जाहीर टीका केल्यावरही पक्षाने त्यांना राज्यातील सर्वात महत्वाच्या मतदार संघात उमेदवारी दिली आहे. येत्या निवडणुकीत आता आशिष देशमुख मुख्यमंत्री फडणवीस यांना कशाप्रकारे आव्हान देतात याकडे संपूर्ण राज्याच लक्ष राहणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *