Mon. Apr 19th, 2021

भर सभेत हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली

गुजरातच्या सुरेंद्रनगरमधील प्रचार सभेत काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांच्या कानाखाली लावल्याचा प्रकार घडला आहे. स्टेजवर हार्दिक पटेल यांचे भाषण सुरु होते आणि अचानक एका अज्ञात व्यक्तीने त्यांनाच्या कानाखाली लावली.यानंतर सभेत गोंधळ निर्माण झाला होता. तेथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला चांगलाच चोप दिला आहे. परंतु हा या सभेतील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नुकतेचं भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांच्यावर भर पत्रकार परिषदेत चप्पल फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. आणि आज हा प्रकार घडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना घडल्याने तणाव निर्माण होत आहे.

नेमकं काय घडलं ?

हार्दिक पटेल यांनी नुकताचं काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

गुजरातच्या सुरेंद्रनगरच्या बलदाना गावामध्ये हार्दिक पटेल यांचया सभेचं आयोजन करण्यात आले होते.

स्टेजवर हार्दिक पटेल यांचे भाषण सुरु होते आणि अचानक एका अज्ञात व्यक्तीने त्यांनाच्या कानाखाली लावली.

यावेळी सभेमध्ये तणाव निर्माण झाला होता तरल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला मारहाण केली.

हा या सभेतील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नुकतेचं भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांच्यावर भर पत्रकार परिषदेत चप्पल फेकण्यात आली होती.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना घडल्याने तणाव निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *